पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान : कोकण – ठाणे विभागामध्ये प्रशिक्षण अभियानात सिंधुदुर्ग भाजपा अंव्वल..

सिंधुदुर्ग भाजपाच्या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा अहवाल प्रदेश सरचिटणीस आम. योगेश सागर यांना सुपूर्द..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :भारतीय जनता पार्टीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग मालवण – चौके येथे यशस्वीरीत्या संपन्न झाले. या जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा अहवाल मुंबई येथे भाजपा च्या प्रदेश कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर यांना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांनी सुपूर्द केला. कोकण – ठाणे विभागात सिंधुदुर्ग जिल्हा अंव्वल ठरला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारणी बैठकीत संपुर्ण राज्याच्या मंडल व जिल्हा प्रशिक्षण वर्गाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये कोकण – ठाणे विभागातील एकुण १८७ मंडलांत सिंधुदुर्ग जिल्ह्याने ९५ % उपस्थिती व नोंदणी शुल्क भरून विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष कौतुक करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघटन मंडलातील प्रशिक्षण वर्गात १११५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला . तसेच जिल्हा प्रशिक्षण वर्गात अपेक्षित १४३ पदाधिकाऱ्यांपैकी १३६ जणांनी निवासी सहभाग नोंदवला व ऑनलाईन नोंदणी शुल्क जमा केले.

या जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गास प्रदेश भाजपाकडून प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर , आमदार प्रशांत ठाकूर , अभियानाच्या प्रदेश सहसंयोजीका प्रा.वर्षाताई भोसले , विधान परिषद आमदार प्रमोदजी जठार , प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी काळसेकर , रवींद्रजी साठे , अभिजीतजी सामंत , जयंतजी जाधव , सोशल मिडीयाचे सागरजी भदये , मुंबई भाजप चे सरचिटणीस राजेशजी शिरवाडकर यांचे वक्ते म्हणून मार्गदर्शन लाभले . तसेच पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांनी जिल्हा प्रशिक्षण वर्गास भेट देऊन मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभियान जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , सहसंयोजक प्रमोद रावराणे , सौ.संध्या तेरसे व श्रीकृष्ण परब या संयोजक टीमने विशेष मेहनत घेऊन जिल्ह्यातील भाजपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा प्रशिक्षण वर्ग यशस्वी झाला.