पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गौरवपूर्ण कार्याची माहिती देणारी राष्ट्र निर्मितीची तपपूर्ती पुस्तिका पत्रकारांना भेट

लांजा (प्रतिनिधी) :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन २०१४ ते सन २०२६ या बारा वर्षांच्या कार्यकाळातील कार्याची गौरव पूर्ण माहिती देणाऱ्या राष्ट्र निर्मितीची तपपूर्ती या प्रदेश भाजपाने प्रकाशित केलेली पुस्तिका आज शुक्रवारी लांजा येथील पत्रकारांना भेट देण्यात आली.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ते पुस्तिका तयार करण्यात आली आहे. गेल्या बारा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातील विविध योजना आणि त्यांनी केलेली कामे यांची माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. राष्ट्र निर्मितीची तपपूर्ती ही पुस्तिका भाजपाच्या वतीने सर्वत्र दिली जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देश सेवेचे अखंड व्रत घराघरात पोहोचविले जाणार आहे.
मराठी पत्रकार परिषद शाखा लांजा च अध्यक्ष सिराज नेवरेकर, यांच्यासह पत्रकार संतोष कोत्रे, संजय साळवी, प्रवीण कांबळे, अनिल कासारे आधी उपस्थित होते. यावेळी भाजपाचे लांजा उत्तर मंडळ अध्यक्ष विराज हरमले, लांजा दक्षिण मंडळ अध्यक्ष
शैलेश खामकर, भास्कर सुतार राजापूर विधानसभा प्रमुख ,चंद्रकांत मांडवकर जिल्हा उपाध्यक्ष, प्रथमेश बेंडल तालुका सरचिटणीस उपस्थित होते.