लांजा (प्रतिनिधी) :लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून यशस्वीपणे धुरा सांभाळणारे महेश सप्रे यांची रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली असून याबद्दल त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
महेश नर्सरीच्या माध्यमातून यशस्वी नर्सरी व्यावसायिक म्हणून ओळख असलेले महेश सप्रे हे सध्या लांजा न्यू एज्युकेशन सोसायटी या लांजा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत. संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या अनुभवाचा व नेतृत्वगुणांचा लाभ जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाच्या कार्यकारिणीला होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान महेश सप्रे यांच्या या निवडीबद्दल
लांजा तालुक्याच्या सामाजिक , शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, संस्थाचालक तसेच नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Home महत्वाच्या बातम्या रत्नागिरी जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाच्या कार्यकारणी सदस्य पदी लांजातील महेश सप्रे...











