कुठल्याही परिस्थितीत वेंगुर्ले तालुक्यात मायनिंग प्रकल्प नको : वेंगुर्ले प. स. सभेत ठराव

सभापती शंकर घारे यांनी केले सदस्य संकेत धुरी यांचे अभिनंदन

वेंगुर्ले : दाजी नाईक
आजगाव, आसोली पंचक्रोशीत नागरिकांचा विरोध असूनही मायनिंग प्रकल्पासाठी वारंवार सर्व्हेक्षण होत आहे. स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपन्न वेंगुर्ला तालुका टिकून राहावा यासाठी तालुक्यात कुठल्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होता नये असा ठराव आजच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सभापती शंकर घारे यांनी मांडला. तसेच सदस्य संकेत धुरी यांनी काल मायनिंग बाबत गावात दाखविलेल्या जागरुकतेबाबत त्यांचे अभिनंदन केले.

वेंगुर्ले पंचायत समिती ची मासिक सभा सभापती शंकर घारे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ.नाथ पै सभागृह येथे संपन्न झाली. यावेळी उपसभापती सचिन देसाई, जिल्हा प्रतिनिधी श्री. कासले, सहाय्यक गटविकास अधिकारी दिनेश पाटकर तसेच सदस्य आपा फणसेकर, नितीन मांजरेकर, संकेत धुरी, सुचिता वजराटकर, साक्षी नार्वेकर, योगिता परब, शीतल राऊळ आणि सर्व खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेमध्ये मायनिंग बाबत विषय येताच सभापती घारे यांनी या मायनिंग ला कडाडून विरोध केला. मायनिंग आपल्या तालुक्यामध्ये होता काम नये. आपले सदस्य संकेत धुरी यांचे त्यांनी अभिनंदन केले. त्यांनी काल याठिकाणी होत असलेले मायनिंग सर्व्हेक्षण हाणून पाडले. अशाच प्रकारे नागरिकांच्या भावना लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत मायनिंग प्रकल्प होता नये असा ठराव सभापती शंकर घारे यांनी सभेत मांडला. तसेच या सभेची प्रत मायनिंग डिपार्टमेंट व जिल्हाधिकारी यांना पाठवावी असे त्यांनी सांगितले.

उभादांडा येथे रस्त्यावर काम केलं ते अनधिकृत बांधकाम सार्वजनिक बांधकाम च्या अखत्यारीत आहे. त्यामुळे त्यांनी त्यावर कारवाई करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली. अतिक्रमण हटवने ही संबंधित विभागाची जबाबदारी असते असे उपसभापती सचिन देसाई यांनी सांगितले.

वेंगुर्ले तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाईल वापरू नये. तशी सत्ता सूचना सर्व शिक्षकांना शिक्षण विभागाने द्यावी अशी सूचना उपसभापती देसाई यांनी मांडली. काही शिक्षक शाळेच्या वेळेत मोबाईलवर बोलत असल्याच्या तक्रारी पालकांच्या आले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने गांभीर्याने या विषयाकडे पहावे. भेटी दरम्यान कोणी शिक्षक मोबाईलवर आढळल्यास कारवाई केली जाईल असे ही त्यांनी सांगितले. यासह विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.