ओटवणेत रविवारी संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग “कुरुक्षेत्र”

ओटवणे (प्रतिनिधी ) आतुरता ग्रुप ओटवणे गावठणवाडी मित्रमंडळ आयोजित गुणी कलावंत सागर गावकर यांच्या अभ्यासू लेखणीतून साकार “कुरुक्षेत्र”हा पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग ओटवणे सातेरी रवळनाथ मंदिर येथे रविवारी २१ जून रोजी ठीक ८. ०० सादर होणार आहे. या नाट्य प्रयोगाला दशावतारातील नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत. नारायण आसयेकर,बाबा मयेकर, दत्तप्रसाद शेणई,निळकंठ सावंत, बंटी कांबळी,गौरव शिर्के,योगेश कोंडूरकर,उदय मोर्ये, सुधीर तांडेल,सागर गावकर, सुयश ठाकूर,संदेश वेंगुर्लेकर, या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.तर या नाट्य प्रयोगाला संगीत साथ हार्मोनियम पप्पू घाडीगावकर,पखवाज किसन नेमळेकर,तालरक्षक शंकर गावकर,यांची लाभणार आहे.या नाट्य प्रयोगाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आतुरता ग्रुप ओटवणे गावठणवाडी मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे.