ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त छत्री व खाऊ वाटप

बांदा भाजपा मंडलचा उपक्रम

बांदा : प्रतिनिधी
राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांचा वाढदिवस बांदा भाजप मंडळतर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्यांना छत्री वाटप तसेच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस जावेद खतीब, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच बाळू सावंत, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, माजी जि. प. शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल तालुकाध्यक्ष मधुकर देसाई, शेर्ले उपसरपंच शामराव सावंत, बांदा ग्रामपंचायत सदस्य रूपाली शिरसाट, लक्ष्मी सावंत, श्याम मांजरेकर, तनुजा वराडकर, प्रशांत बांदेकर, मन की बात अध्यक्ष सिद्धेश महाजन, शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर सावंत, भैय्या गोवेकर, माजी सरपंच बाळा आकेरकर, दीपक सावंत, संतोष सावंत, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, संदीप बांदेकर, गुरु धारगळकर, दर्पण आळवे, शुभम साळगावकर, विलास पावसकर, साई सावंत, गुरु कल्याणकर, औदुंबर पालव, उमेश पेडणेकर आदीसह भाजपा व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.