आणीबाणी हा लोकशाहीवरील काळा डाग – संतोष कानडे

वैभववाडी भाजपच्या वतीने “आणीबाणीची 51 वर्ष” कार्यक्रम संपन्न

वैभववाडी प्रतिनिधी :
आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असून, काँग्रेसने सत्तेसाठी संविधानिक मूल्यांची पायमल्ली केली होती. नागरिकांचे स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या या घटनेची आठवण कायम ठेवणे गरजेचे आहे,” असे मत सिंधुदुर्ग भजनी कलाकार संस्था अध्यक्ष संतोष कानडे यांनी व्यक्त केले.

वैभववाडी भाजपच्या वतीने “आणीबाणीची 51 वर्ष” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संतोष कानडे बोलत होते.

काँग्रेसने २५ जून १९७५ रोजी देशात लागू केलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठा आघात होता. आणीबाणीच्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावून घेण्यात आले, प्रसारमाध्यमांवर निर्बंध लादण्यात आले आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना कारागृहात डांबण्यात आले, अशी टीका श्री कानडे यांनी केली.

यावेळी लोकशाहीच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच देशाच्या लोकशाही व्यवस्थेला बळकट करण्यासाठी संविधानिक मूल्यांचे जतन करणे आवश्यक असल्याचे संतोष कानडे यांनी सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर भाजपा मंडळ अध्यक्ष सुधीर नकाशे, पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते, नगराध्यक्ष श्रद्धा रावराणे, महीला मोर्चा अध्यक्ष प्राची तावडे, जि. प. सदस्य रिध्दी सुतार, श्रावणी रावराणे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, देवानंद पालांडे, साधना नकाशे, सुवर्णा संसारे, शारदा कांबळे, महेश संसारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.