खेड (प्रतिनिधी) : शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या उद्देशाने खेड येथील सौ. नेहा निरंजन दळी यांची शिवसेना महिला आघाडीच्या खेड शहर महिला संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री Ramdas Kadam यांची मंडणगड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान रामदास कदम आणि सौ. ज्योती रामदास कदम यांच्या हस्ते नूतन महिला संघटक नेहा दळी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देतानाच महिला आघाडीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराबाबत मार्गदर्शन करताना रामदास कदम यांनी पक्षाची भूमिका आणि विचार तळागाळातील महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांनी सक्रियपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. संघटन वाढीसाठी महिला कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनसंपर्क वाढवून पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
नियुक्तीबद्दल पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सौ. नेहा दळी यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला सार्थ ठरवत खेड शहरात शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांचे प्रश्न सोडविणे, त्यांना संघटित करणे आणि पक्षाची विचारधारा घराघरांत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी बुटाला यांच्यासह नगरसेविका संजना कुडाळकर, दिप्ती शिगवण, रसिका खेडेकर, रेश्मा खतीब, दिप्ती तोडकरी, अश्विनी वडके, संपदा गुजराथी, श्वेता चिखले, फातिमा मुसा, आरती खेडेकर, मीरा चिखले, रश्मी पाटणे, सई पाटणे, मीनल गांधी, श्रेया जोशी, नूतन सावंत, श्रद्धा कवळे, चित्रा दांडेकर, स्वरा कवळे, सुप्रिया जोगळे, सुप्रिया चव्हाण, नमिता माळी तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.













