संतोष कोत्रे
लांजा-: फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इंग्रजी इंटरमिजिएट परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल लांजा च्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून शाळेचा निकाल हा ९५ % लागला आहे.
भारती विद्यापीठ पुणे, यांच्या वतीने ही परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत लांजा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे. या परीक्षेमध्ये धनश्री हेमंत घाटे आणि ऋतुजा संतोष प्रभूदेसाई या विद्यार्थ्यांनी (विभागून) प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच मृण्मयी जितेंद्र
भडाळे आणि त्रिवेणी समीर सुवारे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. तर प्रांजली किशोर मानकर, आदिती आनंद ठाकूर, ऋग्वेद रुपेश बोडस आणि वेदिका सिद्धार्थ वारंगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या परीक्षेसाठी लांजा हायस्कूल मधून इयत्ता नववी मधील १४३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामधील ३५ विद्यार्थ्यांना विशेष प्राविण्य मिळाले. प्रशालेचा एकूण निकाल हा ९५ टक्के लागला. या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेतील सर्व इंग्रजी विषयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
इंटरमिजिएट परीक्षेत लांजा हायस्कूल ने मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, तसेच पदाधिकारी सुनील कुरूप, सचिव महेश सप्रे यांच्यासह सर्व संचालक वर्ग, प्रशाला मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.













