गुहागर: एअरगन हलगर्जीपणे हाताळणे नडले! स्वतःवरच गोळी झाडल्याने एक जण जखमी, गुन्हा दाखल

गुहागर: तालुक्यातील मौजे पिंपळवाडी येथे राहत्या घरी स्वतःची एअरगन बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने हाताळताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने स्वतःच्याच डाव्या खांद्याला छरा (गोळी) लागून अभिजीत अविनाश कदम (वय ४५, रा. साखराआगर, गणेशवाडी) हे जखमी झाले आहेत.

ही घटना १ जून २०२६ रोजी सकाळी १०:४५ वाजताच्या सुमारास घडली असून, स्वतःच्या व इतरांच्या व्यक्तिगत सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बंदूक हाताळल्यामुळे ते स्वतःच्या दुखापतीस कारणीभूत ठरले, याप्रकरणी अभिजीत कदम यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२५(अ) आणि भादंवि कलम ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.