पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते देवगड शहरात पर्यटन केंद्राचे ५ जुलै रोजी भूमिपूजन
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणार पर्यटन केंद्राचा विकास
देवगड शहरातील शासकीय जागेवर उभारण्यात येणार पर्यटन केंद्र
विविध लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन सोहळा
देवगड, दि. ४ : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते देवगड शहरातील शासकीय जागेवर उभारण्यात येणाऱ्या पर्यटन केंद्राच्या विकासकामाचे भूमिपूजन रविवारी, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समिती, सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून हा विकास प्रकल्प राबविण्यात येत असून, या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नारायण राणे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत,देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष साक्षी प्रभू जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपस्थित राहणार आहेत.
सदर भूमिपूजन सोहळा रविवारी, ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.












