रत्नागिरी :
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व स्किल ट्री कन्सलटिंग यांच्या संयुक्त विद्यमाने संचलित कौशल्य विकास केंद्र रत्नागिरी येथे “चाट चॅम्पियन २०२६” ही एक अनोखी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. शनिवार दि. ०४ जुलै रोजी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागातून स्पर्धक या सहभागी झाले होते. विशेषतः सर्व वयोगटातील महिलांनी व पुरुष स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये सर्वांनी “चाट चॅम्पियन” या थीम ला अनुसरून खूप नाविन्य पूर्ण अश्या उत्तम रेसिपी सादर केली होत्या. जसे की- प्रो-वेज रगडा पॅटीस, न्युट्री नेस्ट चाट, चाट फालूदा, कटोरी चाट, आलू टीक्की, दही भल्ला केक, ढोकळा चाट इत्यादी विविध नाविन्यपूर्ण, चविष्ट आणि खूप विलक्षण अश्या रिसीपीज होत्या.
या स्पर्धेला खरी कसोटी तर परीक्षकांची लागली होती. या स्पर्धेला परीक्षक म्हणून रत्नागिरी मधील खाद्य संस्कृती व हॉटेल व्यवसायातील प्रसिद्ध नाव “कैफ़े सुरस तसेच कैफ़े फ़ूड कल्चर ” चे मालक श्री रश्मीन दुर्वे व कौशल्य विकास केंद्राचे विकी पवार सर परीक्षक म्हणून लाभले होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. प्रांजली सनील डोंगरे (न्यूट्रि नेस्ट चाट) , द्वितीय क्रमांक सौ. मिहिका मंगेश कार्लेकर (प्रो- व्हेज रगडा पॅटिस), तृतीय क्रमांक सौ विधी वैभव गांगण (चाट फालुदा) यांची निवड करण्यात आली तर उत्तेजनार्थ म्हणून सौ. सिद्धी संभाजी देसाई ( वरी कटोरी चाट) यांची निवड करण्यात आली.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आजच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मार्गदर्शन केले व असे वैशिष्ट्यपूर्ण व नाविन्यपूर्ण चाट स्पेशल खाद्यपदार्थ सादर केल्याबद्दल स्पर्धकांचे व कौशल्य विकास केंद्र यांचे आभार व्यक्त केले.
स्पर्धेसाठी “रत्नागिरी खबरदार चे संपादक श्री. हेमंत वणजु यांचे “मीडिया पार्टनर म्हणून विशेष सहकार्य लाभले. तसेच कौशल्य विकास केंद्राचे प्रिंसिपल श्री आदिश मेहता सर व संपूर्ण कर्मचारी वर्गाने मेहनत घेत ही स्पर्धा यशस्वी पार पाडली.













