वसंत लब्दे यांची मुंबईत ‘सह. पोलीस आयुक्त’ पदावर नियुक्ती!

मुणगे गावच्या सुपुत्राची पोलीस दलात दैदिप्यमान कामगिरी

मसुरे | झुंजार पेडणेकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे कारिवणेवाडी गावचे सुपुत्र आणि श्री भगवती हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री. वसंत चंद्रकांत लब्दे यांची नुकतीच मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस आयुक्त (ACP – अभियान, पूर्व नियंत्रण कक्ष, चेंबूर) या उच्च पदावर पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे मुणगे गावासह संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

​श्री. लब्दे यांनी एमपीएससीच्या १९९३ च्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरतीत महाराष्ट्रात तिसरा आणि मुंबईतून प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला होता.

​३० हून अधिक वर्षांची उल्लेखनीय सेवा-
​आपल्या प्रदीर्घ आणि कर्तव्यदक्ष सेवाकाळात श्री. लब्दे यांनी विविध महत्त्वाच्या विभागांमध्ये आणि पोलीस ठाण्यांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आतापर्यंत ​दहिसर पोलीस स्टेशन,
​विमानतळ सुरक्षा विभाग, मुंबई
​मालवणी पोलीस स्टेशन,
​असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर (ACIO), मुंबई
​समतानगर पोलीस स्टेशन,
​एम. एच. बी. कॉलनी पोलीस स्टेशन,
​तिरोडा पोलीस स्टेशन, गोंदिया
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हणून मीरा रोड, नालासोपारा आणि पेल्हार पोलीस स्टेशन (मिरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय) या सर्व ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सेवेची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत १८० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

पोलीस दलात एवढ्या मोठ्या पदावर कार्यरत असूनही, आपल्या गावातील लोकांना आदराने आणि तत्परतेने मदत करणे ही त्यांची खासियत आहे. आपल्या मातीशी आणि शाळेशी असलेले त्यांचे नाते आजही तितकेच घट्ट आहे.

​त्यांच्या या यशाबद्दल श्री भगवती हायस्कूलचे माजी विध्यार्थी, मुणगे कारिवणेवाडी ग्रामस्थ आणि संपूर्ण पंचक्रोशीतून त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले जात आहे.