रत्नागिरी जिल्ह्यात आत्महत्येच्या दोन वेगवेगळ्या घटना;

crime
 चिपळूण आणि लांजामध्ये दोघांनी संपवली जीवनयात्रा

रत्नागिरी प्रतिनिधी:

रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिपळूण आणि लांजा तालुक्यात घडलेल्या या दोन्ही घटनांची नोंद स्थानिक पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
​पहिली घटना चिपळूण तालुक्यातील खेर्डी भुरणवाडी येथे घडली. येथे राहणाऱ्या सिमा देवी (वय ३३ वर्षे, मूळ रा. चिरगाव, मोठ, झाशी, उत्तर प्रदेश) यांनी मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी आपल्या राहत्या खोलीतील पंख्याला नायलॉनच्या रस्सीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
​तर दुसरी घटना लांजा तालुक्यातील बेनी खुर्द बौद्धवाडी येथे घडली. येथे राहणारे संतोष विजय धनावडे (वय ४२ वर्षे) यांनी मंगळवार, दिनांक १४ जुलै २०२६ रोजी रात्री ७:४० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी घरातील लोखंडी बाराला कापडी ओढणीने गळफास लावला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने खाली उतरवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लांजा येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासण्यापूर्वीच मृत घोषित केले. गळफासामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.