कुडाळ | प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये मांसाकरिता अवैद्य गुरे विक्री करणाऱ्या भडगांव चिऱ्याचाव्हाळ येथील लेझरी पीटर डिसोजा (वय- २८) याची उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग कोल्हापूर हद्दीतून दोन वर्षाची हद्दपारी केली आहे. त्याच्यावर अवैद्य दारू वाहतुकीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत.
भडगाव येथील लेझरी डिसोजा या युवकाविरुद्ध कुडाळ कणकवली वैभववाडी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हे दाखल होते यामध्ये अवैद्यरित्या गुरांची वाहतूक करून ही गुरे मांसासाठी कर्नाटक येथे घेऊन जाताना पकडण्यात आले आहे हा गुन्हा त्याने सातत्याने केला आहे. गुरे खरेदी करताना शेतकऱ्यांना दादागिरी करणे त्यामुळे त्याची दहशत निर्माण झाली होती. तसेच अवैद्यरित्या दारू वाहतूक केली आहे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हद्दपारी संदर्भात उपविभागीय दंडाधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता या प्रस्तावावर सुनावणी होऊन भडगाव येथील लेझरी डिसोजा या युवकाची दोन वर्षासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारी करण्यात आली आहे.













