राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील कळसवली येथील पार्वती शिवराम तळेकर वय-88 वर्ष रा. कळसवली तरळवाडी या दि. 17/7/26 रोजी 17.30 वा. राहते घरातून कळसवली येथुना बेपत्ता झाल्या आहेत.
वाढते वय असल्याने त्यांच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी होत होता. त्यांचे वर औषधपचार सुरु होते. त्या माणसांना ओळखत नव्हत्या. याआधी त्या 2-3 वेळा घरातून निघून गेल्या होत्या परंतु त्या मिळून आल्या होत्या. त्या दि. 17/07/26 रोजी दुपारी जेवण करून घरातून कुणालाही न सांगता निघून गेल्या आहेत.तरी त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला तसेच वाडी परिसरात शोध घेऊन देखील त्या मिळून आल्या नाही म्हणून दि. 19/07/26 रोजी नापत्ता दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
त्यांचे वर्णन केस-पांढरे सोडलेले,रंग-सावळा, नाक-लांब सरळ, अंगाने-सडपातळ, नेसनीस-लाल रंगाची मॅक्सी त्यावर पांढऱ्या रंगाची फुले, सवय- चहापिणे, पान सुपारी खाणे, कपाळावर-लाल रंगाची पिंजर, हातात-हिरव्या रंगाच्या 2 बांगडया, पायात-जोडवी, गळ्यात-पिवळ्या रंगाचे धातूचे खोटे मंगळसूत्र, सोबत कोणतीही चीज वस्तू नाही. अशा वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास राजापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो पार्वती तळेकर













