मसुरे | झुंजार पेडणेकर : आषाढी एकादशीनिमित्त जि प शाळा चाफेखोल – तोरसोळे या शाळेत दिंडी काढण्यात आली. शाळा ते साईमंदिर दरम्यान काढलेल्या या दिंडीत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दिपाली पताने, ग्रामपंचायत सदस्या सौ वैशाली गावडे, मिलिंद जाधव, दर्शना बांदल, स्मिता शिंदे, सीमा जाधव, आनंदी खांदारे, यशवंत कदम, संतोष निकम, विद्या घोगळे, मानसी देसाई, विधिता निकम, माया देसाई, शिवाजी पडवळ आदि ग्रामस्थ, पालक, मुख्याध्यापिका सौ मनिषा ठाकर, शिक्षक सुयोग धामापूरकर व विद्यार्थी उपस्थित होते.













