मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
लांजा (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुका भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उस्फुर्त असा प्रतिसाद लाभला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने लांजा तालुका भाजपाच्या वतीने हे रक्तदान शिबिर शहरातील एकलुरे हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत रक्तदान केले.
कार्यक्रमाला जिल्हा सरचिटणीस ओमकार फडके, तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, चंद्रकांत खामकर, भास्कर खामकर, प्रथमेश बेडल, सुनील गुरव, प्रभाकर टोले,परेश नामे, भक्ती शेटये
, अजय गुरव, वाघोजी खानविलकर, जयेश माजळकर, प्रशांत कोटकर, सुयोग तोडकरी, बाबा चांदोरकर, मुग्धा चांदोरकर, दिपक कानशे, अभी खामकर, पिंट्या खामकर, बाबू खामकर आदींसह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.












