खाकी वर्दीतील स्वतःचे पद विसरून पोलीस अधिक्षक नितीन बगाटे यांनी मानसकोंड येथे लुटला शेतकऱ्याच्या शेतातील नांगर चालवून भातलावणीचा आनंद

देवरूख (प्रतिनिधी) :

तळागाळातील जनतेच्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी एकरूप होणे व जनतेच्या खांद्याला खांदा लावून विश्वासाचे नाते जपणे म्हणजे “सोशल पोलीस”व यांचे खरे उदाहरण म्हणजे रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून सर्व जिल्ह्यातील जनतेला व पोलीस बांधवांना दाखवून दिले आहे. कायद्याची अंमल बजावणी करताना माणसातील माणुसकी जपणे हाच लोकाभिमुख पोलीसिंगचा खरा पाया आहे. सामान्यांची कष्टाची माहिती जाणून घेणे व खरे कष्ट करणाऱ्या माणसाला भितीची गरज नसते. हा अनुभव प्रत्यक्ष संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील शेतकरी बांधवांनी अनुभवला.

मुंबई गोवा महामार्गाजवळच लागून असलेल्या मानसकोंड या गावात चालू असलेली शेतनांगरणी व भात रोपांची लावणी प्रत्यक्ष श्री बगाटे यांनी स्वतः नांगर हातात धरून नांगरणी व प्रत्यक्ष तेथील शेतकरी बांधवांसोबत लावणीही केली. एवढ्या मोठ्या अधिकार्यांनी चिखलात उतरुन जनसामान्यांत एकरूप होऊन भावना जाणून घेतल्या. ही बाब कौतुकास्पद असून त्यांच्या या कृतीला नक्कीच सलाम. कोकणचं मूळ म्हणजे कोकणच्या मातीतील भात शेती. त्या मातीशी आणि तेथील जनतेच्या भावनांशी एकरूप होत, त्यांच्या सोबत काम करून पोलीस इन चा आदर्श पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आपल्या कृतीतून संपूर्ण पोलीस दलाला दाखवून दिला आहे. जो शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतो म्हणजेच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख पोलीसिंगचा आदर्श घालून देतो असेच नक्की म्हणावे लागेल.