वेंगुर्ले येथे शिवाजी कुबल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी २८ जुलै रोजी शोकसभेचे आयोजन

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला कुबलवाडा येथील रहिवासी जेष्ठ नेते, शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजी रमाकांत कुबल यांचे गुरुवार २३ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवार २८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ले नगर परिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी यावेळी सर्व नागरिकांनी कै. शिवाजी कुबल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी केले आहे.