Breaking: अणुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतुक ठप्प

बुधवारी पहाटे एकेरी वाहतूक सुरू 

राजापूर । प्रतिनिधी मंगळवारी रात्री झालेल्या पावसात ओणी पाचल अनुस्कुरा मार्गावर अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक टप्पे झाली आहे. मध्यरात्री एक वाजता ही दरड कोसळली. याची माहिती मिळताच तात्काळ राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसाने स्थानिकांच्या सहकार्याने रस्त्यावर आलेले काही दगड बाजूला करून मध्यरात्री एकेरी वाहतूक सुरू केली मात्र एक मोठा दगड रस्त्यावर असल्याने वाहतूक पूर्णपणे सुरळीत करणे शक्य नव्हते.

याबाबत तात्काळ बांधकाम विभागाला कळविण्यात आले बांधकाम विभागाकडून बुधवारी सकाळी जेसीबी सह अन्य साहित्य व कर्मचारी पाठवून रस्त्यावर कोसळलेले दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अनुस्कुरा घाटात दरड कोसळून दगड व माती रस्त्यावर आल्याने पोलिसांनी या परिसरात सुरक्षिततेच्या कारणास्तव बंदोबस्त ठेवला आहे. बुधवारी सकाळीच बांधकाम विभागाच्या वतीने रस्त्यावरील दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे लवकरच हा मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत सुरू होईल अशी माहिती ही बांधकाम विभागाने दिली आहे.