UPDATE: अणुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्ववत

राजापूर । प्रतिनिधी 

ओणी पाचल अनुस्कुरा मार्गावर मध्यरात्री कोसळलेली दरड व दगड माती सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी बुधवारी सकाळी तात्काळ हटवून या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे.

मध्यरात्री एक वाजण्याच्या दरम्यान या मार्गावर दरड कोसळली होती व दगड आणि माती रस्त्यावर आली होती त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

हेही वाचा : Breaking: अणुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळून वाहतुक ठप्प

पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी जात स्थानिकांच्या सहकार्याने छोट्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू केली होती. मात्र बुधवारी सकाळी तात्काळ सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूर यांनी जेसीबी पाठवून आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दगड व माती पूर्णपणे बाजूला करून अनुस्कुरा घाटातील वाहतूक पूर्वत सुरू केली आहे.