रॉयल ग्रुप, कोकण च्या वतीने रविवारी २ ऑगस्ट रोजी ओशिवळे गुरववाडी माळावर रंगणार भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचा थरार

आ. सदाभाऊ खोत, आ. किरण सामंत, आ. प्रमोद जठार व माजी माजी आ. राजन साळवी यांची रउपस्थिती

राजापूर (प्रतिनिधी): रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण मुंबई यांच्या वतीने रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी ओशिवळे गुरववाडी माळावर भव्य चिखल नांगरणी स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.
कोकणातील पारंपरिक बैलगाडी संस्कृती आणि ग्रामीण क्रीडा परंपरेचे जतन करणाऱ्या या स्पर्धेला राज्यभरातील बैलमालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून उत्कृष्ट बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी होणार असून, थरारक चुरशीच्या लढती पाहण्यासाठी हजारो बैलप्रेमी आणि ग्रामस्थ उपस्थित रहातात.
या भव्य स्पर्धेला रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, राजापूरचे आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार तसेच माजी आमदार राजन साळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी रॉयल ग्रुप कोकण ग्रामीण मुंबईच्या ग्रामीण आणि मुंबईतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अथक परिश्रम घेतले आहेत. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचा उत्सव अशा स्वरूपात ही स्पर्धा यंदाही अधिक भव्य-दिव्य करण्याचा आयोजकांचा संकल्प आहे.
ग्रामीण संस्कृती, शेतकरी परंपरा आणि बैलांवरील प्रेम जपणारी ही चिखल नागरी स्पर्धा कोकणातील एक मानाचा आणि प्रतिष्ठेचा सोहळा बनली असून, यंदाही या स्पर्धेकडे संपूर्ण राज्यातील बैलप्रेमींचे लक्ष लागले आहे.