राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या मौजे धोपेश्वर येथील रहिवासी आणि श्री देव धुतपापेश्वर देवस्थानचे माजी विश्वस्त श्रीकृष्ण वासुदेव पळसुलेदेसाई (९०) यांचे गुरूवार दि. ६ ऑगस्ट रोजी राहते घरी वृध्दापकालाने निधन झाले.
वृध्दापकालाने गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती. गुरूवारी पहाटे त्यांची प्रकृती खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. गुरूवारी दुपारी त्यांच्यावर पार्थावावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्री देव धुतपापेश्वर देवस्थानचे विश्वस्त म्हणून अनेक वर्षे कामकाज पाहिले. अत्यंत मनमिळावू व नम्र स्वभाव व सात्वीक वृत्तीचे होते. समाजात त्यांना आदराचे स्थान होते. श्री देव धुतपापेश्वरच्या उत्सवात त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहित मुली, सुन, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे.













