वेंगुर्ले येथे रविवारी ‘उत्सव रानभाज्यांचा’ उपक्रम….

निसर्गभ्रमंती व विविध रानभाज्या ओळखीचे आयोजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी

‘माझा वेंगुर्ला’ संस्थेच्या वतीने उद्या रविवारी, ९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘उत्सव रानभाज्यांचा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत निसर्गभ्रमंती आणि विविध रानभाज्यांची ओळख करून दिली जाणार आहे.

पर्यावरणाशी नाळ जोडणे आणि पावसाळ्यात उगवणाऱ्या पोषक रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमाचे नियोजन झाले असून रविवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६:३० वाजता सर्वजण दाभोली नाका, वेंगुर्ला येथे एकत्र येऊन या उपक्रमाला प्रारंभ होणार आहे. तरी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी राजन : ९४२३३०१३१० निलेश : ९४२२९६४४१६ किंवा खेमराज : ८४२१६९९७९७ यांच्याशी संपर्क साधावा. निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी या उपक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ‘माझा वेंगुर्ला’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.