१८ ऑगस्टला होणार नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा
बांदा : प्रतिनिधी

स्थानिक रोट्रॅक्ट क्लबच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. क्लब अध्यक्षपदी मिताली सावंत, सचिव संकेत वेंगुर्लेकर आणि खजिनदारपदी मयूर मसुरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या कार्यकाळात रोट्रॅक्ट क्लबने सामाजिक भान जपत तब्बल ८० हून अधिक विविध उपक्रम व समाजोपयोगी कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडले. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या वाटचालीला पुढे नेण्याचा निर्धार नूतन अध्यक्ष मिताली सावंत यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी झालेली कामे ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. यावर्षीही अधिक उत्साहाने समाजोपयोगी व तरुणांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवण्यावर आमचा भर असेल, असे प्रतिपादन मिताली सावंत यांनी केले. रोट्रॅक्ट क्लबच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार १८ ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. या कार्यक्रमाला रोटरी क्लबचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच रोट्रॅक्टचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.











