आमदार निलेश राणेंचा वैभव नाईकवर सडेतोड प्रहार

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी वैभव नाईकवर सडेतोड टीका केली. “माझ्यावर गद्दारीचा कलंक नको होता म्हणून मी उबाठा सोडली नाही” हे त्याचे वक्तव्य म्हणजे २०२६ चा सर्वात मोठा विनोद आहे. असे सांगत आमदार निलेश राणे म्हणाले, वैभव नाईक हरणारच होता म्हणून शेवटच्या क्षणाला इलेक्शन फॉर्म दिला नाही. आणि त्यावर हा नीच आहे हे सगळ्यांना माहीत आहे.

ज्या काँग्रेसने याच्या कुटुंबाला सगळं दिलं त्याच काँग्रेसला सोडून हा दुसऱ्या पक्षात गेला, हा घंट्याचा निष्ठावान. याला आता जिल्ह्यात कुत्र उभ करत नाही, हा ग्रामपंचायतीला पडेल याची अशी परिस्थिती झाली आहे.

याचे दोन भाऊ माझ्यामुळे नगरसेवक झाले ते पण हा नमकहराम विसरला पण असो मी लहान लोकांच्या तोंडी लागत नाही, इथून पुढे काही बोलला तर माझे पदाधिकारी उत्तर देतील. “आणि हो रवी चव्हाण साहेबांचा खरा लाभार्थी वैभव आहे हे जग जाहीर आहे. असाही जोरदार प्रहार आमदार निलेश राणे यांनी केला आहे.