वेंगुर्ले : प्रतिनिधी
उभादांडा आडारी येथील सौ. मनिषा गुंडुराज शिरोडकर याच्या घरातील चोरी प्रकरणी
संशयीत उमेश प्रल्हाद पेडणेकर याला पोलीस कोठडी संपल्यानंतर आज कुडाळ न्यायालयासमोर हजर केले असता कुडाळ न्यायालयाचे मे. न्यायधीश श्री. गजानन कुलकर्णी यांनी आरोपी याची रक्कम रुपये ५०,०००/- च्या सर्शत जामीनावर मुक्तता केलेली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. मनीष सातार्डेकर व ॲड. अक्षदा राऊळ यांनी काम पाहिले.
आडारी येथे १७ जुलै २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६ चे दरम्याने ही चोरी घडली. घरफोडीमध्ये तब्बल ३१.५ तोळे सोने चोरीला गेले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी २४ तासात संशयीत म्हणुन एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतले होते त्याची अधिक चौकशी केली असता त्याने उमेश पेडणेकर याच्या साक्षीने सदर प्रकार केल्याचे म्हटले होते त्याच्या म्हणण्याप्रमाणे सदर घरफोडी प्रकरणी संशयीत म्हणुन उमेश पेडणेकर याला पोलिसांनी अटक केली होती व त्याला वेंगुर्ला
न्यायालयासमोर हजर केले असता वेंगुर्ला न्यायालयाने पोलिस कस्टडी सुनावली होती. सदर आरोपीला वेंगुर्ला न्यायालयाचा पदभार कुडाळ न्यालयाकडे असल्याने तेथे पेडणेकर याला सादर करण्यात आले. संशयीत आरोपीच्या वतीने ॲड. मनीष सातार्डेकर यांनी केलेला युक्तीवाद व आरोपीची मांडलेली बाजु ग्राह्य मानुन न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला आहे. तसेच उमेश याने तपासकामात पोलिसांना सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न टाकणे, साक्षीदार न फोडणे, तसेच दर गुरुवारी सकाळी ११ ते १ या वेळेत वेंगुर्ला पोलिस स्टेशन येथे चार्जशीट दाखल होईपर्यंत हजेरी लावण्याच्या अटीवर जामिन मंजूर केलेला आहे.













