चिपळूण नगर परिषद कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी उमेश राजेशिर्के यांची पुन्हा बिनविरोध निवड

 १० टक्के डिव्हीडंड वाटप

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण नगर परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चिपळूण ही गेली ५८ वर्षे कार्यरत आहे. या संस्थेच्या सन २०२५-२६ वर्षाकरिता चेअरमनपदी नगर परिषदेमध्ये २९ वर्षे कार्यरत असलेले व सध्या वसुली विभागामध्ये काम करीत असलेले उमेश राजेशिर्के व व्हा. चेअरमनपदी लेखा विभागातील मयुरी जाधव, तसेच संचालकपदी नगर पालिका आस्थापना विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, उदयान विभाग प्रमुख प्रसाद साडविलकर, नागरी सविधा विभाग प्रमूख वलिद वांगडे, वसुली विभागातील मोहन गोलांबडे, अग्रिशमन विभागातील अमोल विर, पाणी पुरवठा विभातील सुरेश कोकरे आरोग्य विभागातील मनिष जाधव, रोहन सकपाल, सामान्य प्रशासन श्रीमती दिपाली साळवी यांची पुन्हा दुसऱ्या वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कर्मचारी पतसंस्थेमार्फत सर्वसाधारण कर्ज व आकस्मित कर्जाची सुविध असून कर्मचारी यांना तातडीने कमी व्याज दरामध्ये कर्ज पुरवठा करण्यात येत आहे. चिपळूण नगर परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मार्यादित चिपळूण यांची ५८ वी वार्षिक सभा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संपन्न झाली. सदर सभेमध्ये सन २०२५-२६ या साला करिता १० टक्के भरघोस डिव्हीडंड वाटप करणेत आले. त्याबद्दल सर्व सभासदानी चेअरमन व संचालक मंडळ याचा सभेमध्ये अभिनंदनाचा ठराव करणेत आला. तसेच मा. चेअरमान तसेच संचालक यांनी सुचवलेप्रमाणे नविन नियुक्ती कर्मचारी यांना १ वर्षे सेवा पुर्ण झालेली असल्यास त्यांना पतसंस्थेचे सभासद करुन घेणेचे सर्वानुमते ठराव करणेत आला. चेअरमन व व्हा. चेअरमन, तसेच सर्व संचालक मंडळ बिनविरोध झाल्याबदल प्रशासन तथा मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढांबकर, सर्व नगर परिषद अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून तसेच नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.