आ. किरण सामंत यांच्या प्रयत्नांना यश तळवडे बाजारवाडी ते पाचल आठवडा बाजारला जोडणाऱ्या पुलाला मंजूरी

पाचल वार्ताहर : आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने तळवडे बाजारवाडी ते पाचल आठवडा बाजारला जोडणा-या अर्जुना नदीवरील पुलाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून या पुलाचे अंदाज पत्रक देखील तयार करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच या पुलाचे काम मार्गी लागणार आहे.
जलसंपदा विभागाचे अभियंता अमोल बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून पुलाच्या बांधकामाचे सविस्तर अंदाजपत्रक तयार केले आहे. जलसंपदा विभागाकडून विशेष बाब म्हणून या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी पाहणीदरम्यान शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आप्पा साळवी, शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सुनील गुरव, विभाग प्रमुख शैलेश साळवी यांच्यासह तळवडे व पाचल परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याच्या पाचल-जवळेथर रस्त्यावरील या पुलाचा पर्यायी पूल म्हणून उपयोग होणार असून, या पुलामुळे तळवडे व परिसरातील गावांच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे.