लालबागच्या बाल विकास मंडळाचा गुणगौरव सोहळा उत्साहात

 अभिनेते महेश्वर तेटांबे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सन्मान!

चिपळूण (प्रतिनिधी) : लालबाग, मेघवाडी येथील ७५ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या सरकारमान्य संस्था ‘बाल विकास मंडळ’च्या वतीने सन २०२६ चा गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव समारंभ’ अत्यंत दिमाखात आणि उत्साही वातावरणात पार पडला. बालवाडीपासून ते इयत्ता १२ वी पर्यंतच्या विविध वर्गांतील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस आणि शालेय वस्तूंचे वाटप करून सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटांबे उपस्थित होते. श्री. तेटांबे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा तसेच मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. मंडळाचे प्रमुख कार्यवाह अक्षय माळकर यांनी प्रमुख अतिथी महेश्वर तेटांबे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक सदस्य प्रभाकर तोडणकर व संयुक्त कार्यवाह स्वप्निल पाताडे उपस्थित होते. गुणगौरव प्राप्त बक्षीसपात्र विद्यार्थी: बालवाडी: शिवांश बारसकर, स्वराज चेतन तेंडोलकर, आरव स्वप्निल पाताडे, कु. जिज्ञा नारायण परब, मिहित सिद्धेश तोडणकर, दक्ष चौगुले. इयत्ता १ ली: विहान अशोक सिंग, सूर्या सुरेश पेडणेकर, शिवांश विनायक कुवरे, कु. सांची सचिन जोशी, मिहिर मिलींद गावकर, अथांग मनिष शिवगण, दीक्षा अजय लोके. इयत्ता २ री: कु. निधी सचिन जोशी, कु. जिज्ञा नारायण परब, नैतिक योगेश नाचणेकर, कु. प्रचिती प्रथमेश पालव, मनस्वी विक्रम राणे. इयत्ता ३ री: आरोही अरुण टुकरूल, विशाल संदेश तेली, यथार्थ संकेत चव्हाण, अथीश्री रोशन जामदार, परी विवेक सिंग. इयत्ता ४ थी: क्रिशा चेतन गावकर, विराज रमाकांत पांचाळ, स्वरा सचिन परवडी, शर्वी राज पवार. इयत्ता ५ वी: साव्या गिरीश सुर्वे, यश धोंडीराम सावंत, राशी राकेश देसाई, श्रीया सचिन अपंडकर, अक्षय मनिष शिवगण, प्राची योगेश नाचणेकर. इयत्ता ६ वी: तनिषा जितु बोरीचा, विहग रविंद्र दळवी. इयत्ता ७ वी: शंतनू संदिप राणे, पूर्वा योगेश नाचणेकर, साहिल अक्षय माळकर. इयत्ता ८ वी: निरव महेश सोसा. इयत्ता ९ वी: साईश कासले, श्वेता संदिप रावराणे, श्रीया सतीश पालव, देवांग जितु बोरीचा, आरुषी. इयत्ता १२ वी: भक्ति धोंडीराम सावंत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते स्वप्निल पाताडे, चेतन तेंडोलकर, अजिंक्य नकाशे, मनिष बरडे, प्रथमेश पालव, सिद्धेश तोडणकर, प्रविण चव्हाण, धोंडीराम सावंत, भाई सुर्वे व भाऊ पाताडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.