माखजन हायस्कुल मध्ये आनंददायी शनिवारामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

गौरव पोंक्षे माखजन
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आनंददायी शनिवार साजरा करावा असा १४ मार्च २०२४ रोजी शासन निर्णय झाला.यास अनुसरून अनेक ठिकाणी साजरा करण्यात येतो.संगमेश्वर तालुक्यातील माखजन इंग्लिश स्कूल माखजन,ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात गणेशोत्सवा सुटीपूर्वी आलेला शनिवार आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला.नियमित परिपाठ झाल्यावर विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य केले.यावेळी तबला पेटी ढोलकी या वादनांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी गाणी गायली.विद्यार्थ्यांनी रंगी बेरंगी कपडे परिधान केले होते.
दप्तरमुक्त आणि तणाव मुक्त शाळेचा दिवस विद्यार्थ्यांना अनुभवता यावा व विद्यार्थ्यात आत्मविश्वास वाढवा यासाठी हा आनंद दायी शनिवार साजरा केला जातो.यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,अमोल पाटील,महादेव शिंदे,सौ मानसी कोवळे,सौ रुही पाटणकर,सौ कांचन जंगम,सौ हर्षदा कदम,सौ मालती लिंगायत,सौ विशाखा धावडे,प्रा अभिजित सुर्वे,विठ्ठल भोईर,सुनील दिंडे आदिंसह अन्य शिक्षक उपस्थित होते.