गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील नेहमी ग्राहकांनी गजबजलेला असणारा माखजन चा शनिवारचा आठवडा बाजार नेमका गणपती विसर्जनाच्या दिवशी आल्याने सूना सूना पाहायला मिळाला.
गेल्या आठवडा बाजारावेळी देखील,मुंबई पुणेहून येणाऱ्या शहरस्थित ग्रामस्थांची रिघ लागल्याने बाजाराकडे येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील अत्यल्प पाहायला मिळाली होती.माखजनात अन्य दिवसांच्या तुलनेत शनिवारी मोठी उलाढाल होत असते.अगदी नारडुवे पासून कोंडीवरे,कासे,आंबव पोंक्षे,पुर्ये,आदिंसह सुमारे १५ गावातून ग्रामस्थ शनिवारी आठवडा बाजारात खरेदीसाठी दाखल होत असतात.
पण गणपती विसर्जनाचा दिवस असल्याने,अनेकजण आपल्या नातेवाईकांकडे दर्शनासाठी जाणे,आल्या गेल्याची उठ बस करणे यात व्यस्त असलेले पाहायला मिळाले.परिणामी बाजारात भाजीपाला खरेदीला येणाऱ्या ग्राहकांची संख्या घटलेली पाहायला मिळाली.
शनिवारी माखजन बाजारपेठेत भाजीपाला मोठ्या प्रमाणात आला होता.शिवाय फळ विक्रेत्यांची संख्या देखील अधिक होती.परंतु विक्रेते,ग्राहकांच्या प्रतीक्षेत पाहायला मिळाले.अलीकडे पावसाच्या असमानतेमुळे किंवा गणेशोत्सवा दरम्यान भाजा आणि फळांच्या दरात भरमसाट वाढ झालेली पाहायला मिळाली.
एकंदरीतच शनिवारच्या आठवडा बाजारात ,माखजानात शुकशूकाट पहायला मिळाला.












