संगमेश्वरमध्ये गणपती विसर्जन करताना सोनवी नदीत तरुण बुडून मृत्यूमुखी; गावात शोककळा

संगमेश्वरमधील माभळे गणपती विसर्जन घाटावर सोनवी नदीच्या पात्रात गणपती विसर्जन करत असताना प्रज्वल पुरुषोत्तम घडशी (वय २२ वर्षे, रा. माभळे पुनर्वसन, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा तरुण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी मयत प्रज्वल याचे आजोबा, त्याचे वडील, नातेवाईक आणि गावातील इतर लोक माभळे गणपती विसर्जन घाटावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन करत असताना प्रज्वल व त्याचे वडील नदीच्या पाण्यात उतरले होते. दरम्यान, प्रज्वलला पोहोता येत नसल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडून दिसेनासा झाला.
ही बाब लक्षात आल्यानंतर तेथे जमलेल्या नागरिकांनी व पोहणाऱ्यांनी तातडीने नदीच्या पाण्यात शोध घेऊन त्याला बाहेर काढले. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने तेथे हजर असलेल्या पोलीस वाहnधून त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डाॅक्टरांनी तपासणी करून प्रज्वलला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.