श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २६ सप्टेंबर रोजी श्री सत्यविनायक महापूजा!

मसुरे | झुंजार पेडणेकर : श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे शनिवार दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी

भाद्रपद पौर्णिमा निमित्त श्री सत्यविनायक महापूजा आयोजित करण्यात आली आहे.

तरी भाविक-भक्तांनी दर्शन, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. सकाळी ८ :०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति वरती आणि स्वामी पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन

विशेष अभिषेक, सकाळी ९ :३०: ०० वा. श्री सत्यविनायक महापूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा. महाप्रसाद-अन्नदान,

सायंकाळी ४:१५ वा. सुस्वर भजन, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट यांच्या वतीने करण्यात आले आहे.