दीर्बादेवी रामेश्वर देवस्थानाचे कुलकर्णी लेखनिक वासुदेव कुलकर्णी यांचे निधन

देवगड,

 

जामसंडे येथील दिर्बादेवी रामेश्वर देवस्थानाचे कुलकर्णी लेखनिक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. कीर्तनभूषण वासुदेव बुवा कुळकर्णी यांचे सोमवारी सकाळी ७ वाजता राहत्या घरी वार्धक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने जामसंडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यू समयी त्यांचे वय 90 वर्षे होते

 

दिर्बादेवी मंदिरातील पारंपारिक तलवार धरण्याचा मान यांच्याकडे होता उत्तम कीर्तनकार म्हणून पंचक्रोशी मध्ये त्यांची ओळख होती त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

 

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी यांचे ते वडील होत.

 

त्यांचा अंत्यविधी सोमवारी सायंकाळी ५ वाजता जामसंडे येथील स्मशानभूमीत होणार आहे.