पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान; सरसकट पंचनामे करा
आमदार निलेश राणे यांचे मालवण तालुक्यात प्रशासनाला निर्देश
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक नुकसानीची केली पाहाणी
शेतकऱ्यांशी संवाद साधत महायुती सरकार पाठीशी असल्याचा दिला विश्वास
मालवण | प्रतिनिधी : पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे बाधित झालेल्या मालवण तालुक्यातील विविध भागातील शेतीची आमदार निलेश राणे यांनी गावागावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा आणि समस्या जाणून घेतल्या.
पावसा अभावी अनेक ठिकाणी पीक आलेच नाही. काही ठीकणी आलेल्या पिकाची वाढ खुंटली, पीक जळून गेले. शेतकऱ्यांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. सरसकट सर्व पंचनामे करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवा. असे निर्देश आमदार निलेश राणे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महायुती सरकार कटीबद्ध आहे. आम्ही सर्व शेतकऱ्यासोबत आहोत. हा विश्वास आमदार निलेश राणे यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.
मालवण तालुक्यात सुकळवाड, चौके, कुंभारमाठ यांसह परिसरातील गावात प्रत्यक्ष शेतीची पाहाणी आमदार निलेश राणे यांनी केली. तसेच तहसीलदार व कृषी अधिकारी यांच्या कडून तालुक्याचा आढावा घेतला. तालुक्यात सुमारे 8 हजार हेक्टरवर प्रमुख भात पीक मोठया प्रमाणात तसेच भुईमूग व नाचणी आदी पीक ही घेतले जाते. यां सर्व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यां सर्वांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. बांधकाम सभापती संतोष साठविलकर, पंचायत समिती सभापती सौ. प्रज्ञा चव्हाण, जि. प. सदस्या सुमेधा पाताडे, जिप सदस्या अक्षता गावडे, पस सदस्या मानसी भोगावकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, राजा गावडे, तालुका प्रमुख मंदार लुडबे, सुकळवाड सरपंच युवराज गरुड, चौके सरपंच शिवप्रसाद चौकेकर, नांदरुख सरपंच गोविंद चव्हाण, आंबेरी सरपंच मनमोहन डिचोलकर, कुंभारमाठ सरपंच पुनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, प्रमोद भोगावकर, मधुकर चव्हाण, पंढरीनाथ माने, शेतकरी जगदीश शिरोडकर अन्य शेतकरी, लोकप्रतिनिधी, कृषी व अन्य अधिकारी उपस्थित होते.











