आचरा-अर्जुन बापर्डेकर
चिंदर गावडेवाडी येथील मंगेश गावकर यांच्या निवासस्थानी विराजमान श्री गणेशोत्सवानिमित्त आज रात्रौ ९.३० वाजता डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ कुडाळ भरणी बुवा श्री विनोद चव्हाण विरुद्ध निना देवी प्रासादिक भजन मंडळ उंडील तालुका देवगड बुवा श्री व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजनाचा जंगी सामना होणार आहे. तरी भजन प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भजनाचा आनंद घ्यावा असे आवाहन शिवसेना उपतालुकाप्रमुख मंगेश गावकर यांनी केले आहे.










