वेंगुर्ले येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम संपन्न..
वेंगुर्ले : दाजी नाईक
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुलं कुपोषित राहू नयेत यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्याचा पुरेपूर लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोचवा. आपला हा उत्कृष्ट असा उपक्रम पाहता जिल्हा परिषद नेहमी आपल्या पाठीशी उभी राहील असे आश्वासन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी दिले. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प वेंगुर्ला यांचे मार्फत वेंगुर्ले येथील साई डीलक्स हॉल येथे ९ वा राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
वेंगुर्ले येथील या कार्यक्रमात व्यासपीठावर वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संजय गावडे, सौ सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, गटविकास अधिकारी श्री वासुदेव नाईक, आसोली सरपंच बाळा जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. मोरे मॅडम, पर्यवेक्षिका सौ.सामंत मॅडम, सौ परब मॅडम, सहाय्यक संरक्षण अधिकारी अक्षय कानविंदे, तालुका समन्वयक निशांत तसेच सर्व वेंगुर्ला प्रकल्पातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय पोषण महा साजरा करण्यात येत आहे. सन २०२५ च्या संकल्पनेनुसार “आमची अंगणवाडी आमची जबाबदारी” या मुद्द्यावर रचलेली आहे या अभियानात ० ५ मूल्य पोषणावर आधारित आहेत तसेच सेवा संकल्प अभियानामध्ये सर्व सेविका मदतनीस यांनी गावातील तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या आहेत.
सदर कार्यक्रमांमध्ये सेविकांनी टाकाऊतून टिकाऊ, THR पाकिटा मधून लाभार्थ्यांना दिलेल्या पाककृती पौष्टिक पदार्थ कडधान्यापासून दागिने बनविणे इत्यादी साहित्याचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले होते. त्याचबरोबर अंगणवाडी सेविकांचे पोषण आहारावर आधारित नाटिका फुगडी असे विविध गुणदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाले. उपस्थित मान्यवरांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना काम करताना कोणत्याही समस्या निर्माण झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नियमित उभे राहून असे आश्वासन दिले.
यावेळी अंगणवाडी सेविकांनी लावलेल्या प्रदर्शनातील शेतीची अवजारे विशेष लक्षणीय ठरली. परुळे चिपी येतील अंगणवाडी सेविकांनी केलेल्या शेती अवजारांचे वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे यांच्यासह मान्यवरांनी विशेष कौतुक केले. उपस्थित सर्वांचे सौ मोरे मॅडम यांनी आभार मानले.












