सरपंचांसह सर्वांचे श्रमदान !
फोंडाघाट – मारुतीवाडी येथे उगवाई नदीवर जलसंधारण अंतर्गत वनराई कच्चा बंधारा बांधण्यात आला.यावेळी सरपंच सौ संजना आग्रे यांचे सह ग्रामपंचायतच्या उपसरपंच, सदस्य, कर्मचारी वर्ग,सीआरपी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन, उभारणी केली. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने लगतच्यांनी समाधान व्यक्त केले..













