सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळातर्फे ऑगस्ट २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (CIT), कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन (CCAOA) तसेच सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग (DTP) या परीक्षांमध्ये प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. शिवम जयानंद कानसे याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर कु. पूजा दिनेश मोरे हिने द्वितीय आणि कु. संचिता राजू पारधी हिने तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ८७.९५ टक्के, ८५ टक्के आणि ८२.७५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. सुरज कांता गावडे याने जिल्ह्यात प्रथम, कु. नेहा संदीप चव्हाण हिने द्वितीय, तर कु. साक्षी संतोष केणी हिने तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे ८०.०५ टक्के, ७९.५० टक्के आणि ७८.२५ टक्के गुण मिळवले.
तसेच सर्टिफिकेट कोर्स इन डेस्कटॉप पब्लिशिंग या अभ्यासक्रमात कु. पुनम नितीन नाटेकर हिने ८९.५० टक्के गुणांसह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. कु. कुणाल कांचन मायटी याने ८८.५० टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. देवयानी संजय सावंत हिने ८८.२५ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला. या तिन्ही अभ्यासक्रमांसाठी संस्थेतून एकूण २१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये निधी होडावडेकर, प्रिया लातिये, नेहा नेमळेकर, समृद्धी गावडे, समीक्षा तिवरेकर, आयुष जाधव, जगन्नाथ साळगांवकर, सिद्धेश पाटील, शिवम कानसे, रोहन गावडे आणि अक्षरा शिरोडकर यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे प्राचार्य संदीप देवळी यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना पल्लवी मेस्त्री आणि पुनम नाटेकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच आयटी, डीटीपी आणि टॅली या अभ्यासक्रमांच्या नवीन बॅचसाठी प्रवेश सुरू असून, प्रवेशासाठी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.












