चाफेखोल येथे वनराई बंधारा!

मसुरे | झुंजार पेडणेकर :                   जि प प्राथ शाळा चाफेखोल – तोरसोळेच्या शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी यांच्या मार्फत चाफेखोल गावातील माळवाडी गवळदेव येथे वनराई बंधारा बांधण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा साै दिपाली पताने, माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री यशवंत कदम, श्री मिलिंद जाधव , सौ दिपीका वरक सौ विद्या घोगळे, श्रीमआनंदी खंदारे ,सो दर्शना बांदल, सौ सारिका वरक, श्री मयुरेश तळावडेकर मुख्याध्यापिका सौ मनिषा ठाकर उपशिक्षक श्री सुयोग धामापूरकर, विद्यार्थी उपस्थित होते