मसुरे | झुंजार पेडणेकर :गावाच्या शाश्वत विकासासाठी आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पळसंब डिगीवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून वहाळावर बंधारा उभारला. ग्रामस्थांच्या या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उन्हाळ्यात विहिरी व ओढ्यांची पाण्याची पातळी टिकून राहावी, शेती व जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, तसेच परिसरातील भूजल पातळीत वाढ व्हावी, या मुख्य उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचा अवलंब करत ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेऊन हे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले.
यावेळी चंद्रकांत परब, दिलीप परब, रघुवीर सरमळकर, मधुकर जोईल, सत्यवान तेजम, महेंद्र सरमळकर, तुकाराम परब, अनिल तेजम, रामदास सरमळकर, अक्षय परब, सुशांत तेजम, योगेश तेजम, राज सरमळकर, स्वप्निल परब, केशव सरमळकर व निलेश तेजम उपस्थित होते.













