ग्रामपंचायत वडाचापाट येथे एसटी स्मार्ट कार्ड वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर
पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत वडाचापाट येथे एसटी स्मार्ट कार्ड नोंदणी व वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व लाभार्थ्यांना नुकतेच एसटी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले.

​ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई, उपसरपंच श्री. सचिन पाताडे, कृषी विस्तार अधिकारी व्ही. के. जाधव, माजी पंचायत समिती सभापती श्री. राजेंद्र प्रभुदेसाई, गावचे उद्योजक श्री. दयानंद प्रभुदेसाई, तसेच ग्रामपंचायत सदस्य सौ. सोनल मांजरेकर, सौ. वेदिका माळकर व श्री. विनायक प्रभुदेसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.

​यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि बचत गटाच्या पालव मॅडम यांच्यासह ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

​या उपक्रमामुळे ग्रामस्थांना एसटी प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने घेता येणार आहे. कार्ड प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामस्थांच्या सोयीसाठी राबविलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी ग्रामपंचायत वडाचापाट व सर्व मान्यवरांचे आभार मानले.