स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीची परुळेबाजार ग्रा.पं.ला भेट देऊन मुल्यमापन

परुळे | प्रतिनिधी
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत केंद्रस्तरीय समितीने परुळेबाजार ग्रामपंचायतीला आज भेट देऊन मुल्यमापन केले व विविध स्वच्छता विषयाक उपक्रमांची पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत परुळेबाजार ग्रा.प.सह जिल्हयातील आणखी तीन ग्रा.पं.च्या राज्य स्तरावरून केंद्रस्तरावर निवड झाली त्या अनुषंगाने केंद्रस्तरीय समिती मुल्यमापनासाठी परुळेबाजार येथे दाखल झाली. या समितीत अभय यादव, कमलाशंकर यादव, यांचा समावेश होता. यावेळी जिल्हास्वच्छता कक्षाचे निलेश मठकर, पं. स वेगुर्लच्या अक्षता नाईक आदी उपस्थित होते. यावेळी सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, ग्रा.पं सदस्य प्रदिप प्रभु, अभय परुळेकर, सुनाद राऊळ, सीमा सावंत, नमिता परुळेकर, तन्वी दुद‌वडकर, पुनम परुळकर, प्राजक्ता पाटकर, आदींसह प्रसाद पाटकर, सुधीर पेडणेकर, प्राजक्ता चिपकर ग्रामसेवक शरद शिंदे यांसह ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी, शिक्षकवर्ग उपस्थित होते. यावेळी स्वच्छ सर्व्हेक्षण ग्रामीण 2023 अनुषंगाने समिती अधिकाऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने प्रश्नांची उत्तरे संबंधीत विभागाच्या साईटला पाठविण्यात आली. ऑनलाईन पद्धतीने समितीने प्रत्येक स्वच्छते विषयक उपक्रमाची बारकाईने माहिती घेतली आहे. समितीने ग्रामपंचायत च्या उपक्रमांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले.