दुर्गंधीयुक्त कचरा घेऊन जाणारी घंटागाडीसह संतप्त नागरिकांनी नगरपंचायतमध्ये दिली धडक
दुर्गंधीयुक्त कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याची मागणी; देवरूखातील कचराप्रश्न पेटला
देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पातील दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे कांजिवरा परिसरातील नागरिक व ग्रामस्थ त्रस्त झाले असून,दुर्गंधी आणि माश्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या समस्येमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दुर्गंधीयुक्त कचरा वाहून नेणारी घंटागाडी अडवली व थेट नगरपंचायतमध्ये धडक देत प्रशासानाला जाब विचारला.
घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याची नागरिकां ची तक्रार केली असून दुर्गंधीयुक्त कचऱ्याची घंटागाडी सह थेट नगर पंचायत मध्ये धडक दिली. दुर्गंधी आणि माश्यांच्या त्रासा मुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगणेही कठीण होत असून,तसेच आसपासच्या विहिरीचे पाणीही दूषित होत असल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या समस्ये कडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन दुर्गंधी युक्त कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावावी,अशी मागणी उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आली.
घनकचरा प्रकल्पाच्या दुर्गंधी च्यासमस्ये बरोबरच परिसरा तील १२ फुटी रस्त्याचे कामही अपूर्ण असल्याचा मुद्दा स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. संबंधित रस्त्याचे काम तातडी ने पूर्ण करून नागरिकांची गैर सोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित प्रश्न प्रलंबित राहणे योग्य नसून,नगरपंचायत प्रशासनाने केवळ तक्रारींची दखल घेण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कार्यवाही करणे आवश्यक आहे.
घनकचरा प्रकल्पातील कचऱ्या ची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, दुर्गंधी व माश्यांचा प्रादुर्भाव रोखण्या साठी आवश्यक उपाययोजना करणे,परिसराची स्वच्छता राखणे आणि अपूर्ण १२ फुटी रस्त्याचे काम पूर्ण करणे या मागण्यांवर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी. नागरिकांना दुर्गंधी,अस्वच्छता आणि आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागू नये,यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घ्यावा व ठोस उपाययोजना राबवाव्यात,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आता नगरपंचायत प्रशासन या गंभीर समस्येची किती तत्परतेने दखल घेते आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे कांजिवरा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.













