भुवडवाडीतील महिलांचा उपक्रम
गौरव पोंक्षे माखजन:
भविष्यात येणारी पाणी टंचाई ,वेळीच लक्ष्यात घेत,कुणी येईल आणि बांधरा बांधून देईल अशी वाट न पाहता संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावातील भुवड वाडीतील महिलांनी पुढे येत स्वतः बंधारा बांधला आहे.महिलांनी स्वतःहून केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आंबव पोंक्षे ग्रामपंचायतीचे सरपंच शेखर उकार्डे व अन्य सदस्यांचे देखील मार्गदर्शन लाभले. पाणी पातळी सध्या झपाट्याने खाली कमी होत आहे.दरवर्षी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वाहणारे ओढे आत्ताच आटायला लागले आहेत.अगदी कमी पाणी ओढ्यातून वाहत असल्याचे गावीगावी लक्ष्यात आल्यावर बंधारे बांधण्यास सुरवात झाली आहे.आंबव पोंक्षे तील भुवड वाडी महिला मंडळाने देखील आपल्या वाडी.लगत असलेल्या ओढ्याला बंधारा घातला आहे.की जेणे करुन नजिकच असलेल्या विहिरीची पाणी पातळी टिकून राहील.वाहून जाणारे पाणी अडल्याने ,आजूबाजूच्या विहिरीत व कुपनलिकांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली नेहमीच पाहायला मिळते.महिलांनी घेतलेल्या पुढाकाराने एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.
आंबव पोंक्षे गावात प्रत्येक ओढ्यावर वनराई बंधारे घालण्याचे काम हाती घेत असल्याचे सरपंच शेखर उकार्डे यांनी सांगितले.













