गळफास लावलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळला

रेवंडी तांडेलवाडी सडा मार्गांवरील घटना : परिसरात खळबळ 

श्वान पथक ठसे तज्ञ यांना बोलावले : पोलिसांकडून तपास सुरु 

अमित खोत | मालवण : मालवण तालुक्यातील रेवंडी तांडेलवाडी सडा मार्गांवरील एका तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी झाडाला दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत दिसून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

दरम्यान, पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली. पोलीस, स्थानिक नागरिकही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस तपासात मृतदेह श्रीधर गुरुकृष्ण नरे (वय सुमारे 34)

रा. नरेवाडी मिठबाव देवगड यांचा असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह बाजूला एक मोटरसायकल व एक बॅग दिसून आली. श्रीधर नरे हे मंगळवारी संध्याकाळ पासून बेपत्ता असल्याची माहितीही समोर आली आहे.

 

दरम्यान, मालवण पोलीस ठाणे प्रभारी डीवायएसपी दिपक शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन रेवंडकर, राजाराम तेरेखोलकर व अन्य टीम दाखल झाली होती. श्वान पथक ठसे तज्ञ यांना बोलावले होते. काही मिटर परिसर पोलीसांनी सिल केला असून अधिक तपास सुरु आहे.