आमदार निलेश राणे यांनी घेतले सावंतवाडीतील दुर्गा मातेचे दर्शन 

 

आमदार निलेश राणे यांनी बुधवारी रात्री सावंतवाडी शहरातील बाजारपेठ नवरात्र उत्सव मित्रमंडळाच्या दुर्गा मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर यांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब, उप जिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडीस, युवा सेना तालुका प्रमुख क्लेटस फर्नांडीस, नगरसेवक देव्या सुर्याजी, बंटी पुरोहित, माजी नगरसेवक गुरुदास मठकर, संतोष मुंज, सकल मराठा समाज जिल्हाध्यक्ष पत्रकार सिताराम गावडे, परीक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच बरोबर त्यांनी सावंतवाडी जिमखाना व भटवाडी येथील दुर्गेचे देखील दर्शन घेत आशीर्वाद घेतले.