सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला किसान सशक्तीकरण परियोजना अंतर्गत एकात्मिक शेती प्रभाग विकास प्रकल्प (IFC) श्री सद्गुरू साटम महाराज महिला प्रभाग संघ, आंबोली ,तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग, यांच्या कार्यक्षेत्रातील सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ, बावळाट येथील महालक्ष्मी उत्पादक गटामार्फत रोपवाटिका (नर्सरी) व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. सेवा संकल्प अभियानांतर्गत शनिवारी, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी या नवीन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या रोपवाटिका व्यवसायाचे अधिकृत उद्घाटन समूहाच्या अध्यक्षा, सचिव आणि तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुका अभियान व्यवस्थापक स्वाती रेडकर मॅडम, प्रभाग समन्वयक गजानन राठोड सर, प्रभाग संघ व्यवस्थापक मंजिरी बांदेकर मॅडम, IFC Block Anchor कनक सुकी, वरिष्ठ सीआरपी सत्यभामा परब, ग्रामसखी कृपाली परब, समीक्षा कानसे, वैष्णवी बांदेकर व इतर सर्व कॅडर उपस्थित होते.
तसेच या प्रसंगी LSC समितीचे सदस्य, उत्पादक गटातील सर्व पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसंघाच्या अध्यक्षा, सचिव आणि समूहातील सर्व महिलांची विशेष उपस्थिती लाभली होती. उपस्थितांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला.













